
Free Daily Podcast Summary
by महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना
Get key takeaways, quotes, and insights from लेक लाडकी in a 5-minute read. Delivered straight to your inbox.
The most recent episodes — sign up to get AI-powered summaries of each one.
लेक लाडकी ही योजना नेमकी काय आहे, ती कशी राबविली जाते याची माहिती घेतानाच या पॉडकास्टमध्ये ऐका, ही योजना ज्या अंगणवाडी सेवेच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचते आहे, तेथील प्रतिनिधीने योजनेस लाभणारा प्रतिसाद, योजनेविषयी सर्वसामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न, लाभार्थ्यांना दिली जाणारी मदत, येणारे अनुभव व अशा अनेक विषयी साधलेला संवाद.
मुलगी म्हणजे ओझे या संकुचित आणि बुरसटलेल्या विचारांतून बाहेर पडून मुलगी असण्याचे फायदे कोणते आहेत, हे जर एकदा समजले तर सर्व समाजालाच नवी दिशा मिळू शकते. मुलींकडे अशा कोणत्या निसर्गदत्त क्षमता असतात, ज्या त्यांना इतरांपेक्षा अधिक सहनशील, धैर्यवान आणि कर्तृत्ववान बनवतात याचा संध्याताई नगरकर यांनी घेतलेला वेध.
शाळागळती या समस्येत प्रामुख्याने मुलींचे थांबलेले शिक्षण, बालविवाह अशी मुख्य कारणे दिसतात. अशा परिस्थितीत, त्यांच्या शिक्षणास प्राधान्य मिळाले तर तिचे कुटुंबच नव्हे तर सर्व समाज प्रगतीपथाला लागू शकतो. यासाठी लेक लाडकी सारखी योजना किती मोलाची मदत करते, याविषयी संवादरुपात केलेली उलगड.
अंगणवाडीच्या माध्यमातून राज्यातील फार मोठा घटक शाळापूर्व शिक्षणाला जोडला गेला आहे. तिथे काम करणाऱ्या ताईंच्या माध्यमातून या मुलांची जडणघडण तर होतेच शिवाय पालकांनाही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. अशी ही अंगणवाडी सेवा नेमकी कशी चालते, त्याचा लाभ कुणाला व कसा होतो तसेच लेक लाडकी सारख्या योजनेला अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जाते आहे, याविषयी बालविकास प्रकल्प अधिकारी संध्याताई नगरकर यांनी या संवादातून उलगडून दाखवले आहे.
एका भटक्या कुटुंबात अतिशय कष्टात दिवस काढणाऱ्या कुटुंबातील जानूबाई आणि त्यांची सून कविता यांच्या आयुष्यात लेक लाडकी योजना आली आणि त्यांच्या मनातील चिंतेची जागा आनंदाने घेतली. त्यांची लेक आता लाडाची लेक बनली होती... वंचित समाजघटकांमध्ये लेक लाडकी योजनेमुळे मुलींच्या जन्माला आणि जगण्याला मिळू लागणारा सन्मान ही समाजाच्या प्रगतीचीच पायाभरणी करणारी बाब ठरते.
वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या शेखरच्या आयुष्यात मोठ्या आर्थिक अडचणी होत्या. अशातच आपल्याला मुल होणार असल्याची आनंदाची बातमी त्याला समजली पण मुलगी झाली तर कसं, याची चिंता त्याला सतावू लागली. अशातच, लेक लाडकी योजना त्याला समजली आणि मनात दाटलेल्या शंकांचं मळभ दूर झालं. लेक लाडकी योजना अशाच कित्येक मजुरांच्या आयुष्यात आशेचा किरण घेऊन आली आहे.
एखाद्या अनपेक्षित धक्क्यामुळे सारी घडीच विस्कळीत होऊन जाते, तेव्हा त्यातून सावरणं अवघड असतं. आनंदच्या आयुष्यातही असाच प्रसंग आला.. मुलगी झाली पण पत्नी गेली. अशा वेळी प्रश्नांची मालिका सुरु झाली. घरच्यांचा भक्कम पाठिंबा तर त्याला मिळाला होताच मात्र, लेक लाडकी सारखी योजनाही आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी लाभदायी ठरु शकते, याची त्याला खात्री पटली. त्यामुळेच तो त्या दुःखातून बाहेर पडून पुन्हा आनंदी होण्याकडे वाटचाल करु शकला...
आयुष्यात अकस्मात आलेल्या संकटांच्या मालिकांतून धैर्यानं पुढे जाण्याची जिद्द काही जणींमध्ये असते. पोटात जीव घेऊन घराबाहेर पडावं लागलेल्या शैलाच्या आयुष्यात अशाच संकटांची मालिका आली. पण तिनं माघार घेतली नाही. पती नाही, घरदार नाही, पैसा नाही अशा बिकट अवस्थेत असतानाच तिला सिव्हिल हॉस्पिटलचा आधार मिळाला आणि तेथील आशाताईचा भक्कम आधार मिळाला. मुलीचा जन्म झाला. मुलीला तिनं उत्तम शिकवलं आणि ती मोठी होऊन तिचा विवाहही झाला...ती आई झाली. कन्यारत्न पदरात पडले अन् एक भयानक संकट ओढवले...नियतीच्या या निष्ठूर खेळातून बाहेर कसं पडायचं याची चिंता असतानाच एक लेक लाडकी योजनेचा फार मोठा आधार लाभला अन् तिनंही धीरानं परिस्थिती बदलून टाकली. समाजात असा संघर्ष करणाऱ्या असंख्य जणींना अडचणीवर मात करण्यासाठी अशा योजना केवळ मदत करीत नाहीत, तर त्यांना जगण्याची नवी उमेद देतात.
Free AI-powered daily recaps. Key takeaways, quotes, and mentions — in a 5-minute read.
Get Free Summaries →Free forever for up to 3 podcasts. No credit card required.
Listeners also like.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत, लेक लाडकी ही अभिनव योजना राबविण्यात येते. ही योजना सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही पॉडकास्ट मालिका तयार करण्यात आली आहे. समाजातील गरजू व वंचित घटकांमधील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी ही योजना अत्यंत मोलाची मदत करते. म्हणूनच, काही प्रातिनिधिक गोष्टीवजा उदाहरणे, संवाद आणि माहिती यांतून सजलेली ही पॉडकास्ट मालिका आपणास निश्चितच आवडेल.
AI-powered recaps with compact key takeaways, quotes, and insights.
Get key takeaways from लेक लाडकी in a 5-minute read.
Stay current on your favorite podcasts without falling behind.
It's a free AI-powered email that summarizes new episodes of लेक लाडकी as soon as they're published. You get the key takeaways, notable quotes, and links & mentions — all in a quick read.
When a new episode drops, our AI transcribes and analyzes it, then generates a personalized summary tailored to your interests and profession. It's delivered to your inbox every morning.
No. Podzilla is an independent service that summarizes publicly available podcast content. We're not affiliated with or endorsed by महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजना.
Absolutely! The free plan covers up to 3 podcasts. Upgrade to Pro for 15, or Premium for 50. Browse our full catalog at /podcasts.
लेक लाडकी publishes daily. Our AI generates a summary within hours of each new episode.
लेक लाडकी covers topics including Government, Kids & Family, Family. Our AI identifies the specific themes in each episode and highlights what matters most to you.
Free forever for up to 3 podcasts. No credit card required.
Free forever for up to 3 podcasts. No credit card required.